Atul Parchure

Atul Parchure : राज ठाकरे कसा माणूस आहे? अतुल परचुरेंने दिले ‘हे’ दिलखुलास उत्तर

773 0

मुंबई : मनसे अध्यक्ष हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकारांना सढळ हस्ते मदत केली आहे. चित्रपटांना प्राईम टाइम मिळवून देण्यापासून ते कलाकारांचा उचित गौरव करण्यापर्यंत राज ठाकरेंनी नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीला मदत केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे मराठी कलाकारांचे त्यांच्यासोबत मैत्रीत्वाचे नाते आहे. बरेच मराठी कलाकार त्यांच्याविषयी भरभरून बोलत असतात. सध्या मराठमोळे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये ते राज ठाकरे यांच्याबद्दल दिलखुलासपणे बोलताना दिसत आहेत.

सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे यांना ‘राज ठाकरे नेमका कसा माणूस आहे? राज ठाकरे काही बदलू शकतील का?’ असा प्रश्न विचारण्यात आल्यावर अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ आपली भूमिका स्पष्ट केली. “राज ठाकरे यांच्यात बदल घडवण्याची इच्छा आहे हे मी नक्की सांगू शकतो. त्यांना मनापासून वाटतं की जे चाललंय ते बदललं पाहिजे. हे मी मनापासून सांगू शकतो. याची मला खात्री आहे, कारण आमच्यात एवढी ओळख आहे. मी त्यांना शाळेपासून ओळखतो. ते माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहेत. तेव्हा मी बालनाट्यात काम करत होतो. मी फेमस होतो. कॉलेजमध्ये आल्यावर आमची रेग्युलर भेट होऊ लागली.”

“राज ठाकरेंकडे व्हिजन आहे. त्यांना मनापासून इच्छा आहे. ते खूप चांगले आहेत. ते यारो का यार आहेत. इतक्या सढळ हस्ते आपल्या आजूबाजूच्या माणसांना देणारा माणूसच नाही. हे मी मनापासून सांगतो कारण, मी खूप तास त्यांच्यासोबत घालवले आहेत”, असे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!