Aatmapamphlet Movie

Aatmapamphlet Movie : मराठी चित्रपटाचा परदेशात डंका! ‘आत्मपॅम्फ्लेट’ला मिळाला ‘हा’ मानाचा पुरस्कार

858 0

मुंबई : एशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी अँड ऑस्ट्रेलियन टिचर्स ऑफ मीडिया क्विन्सलँड येथे आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाला ‘एशिया पॅसिफिक यंग ऑडियन्स अवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात सुमारे 70 हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता. त्यातून तीन चित्रपटांची निवड झाली असून त्यामध्ये इंडोनेशियन, मलेशियन आणि ‘आत्मपॅम्फ्लेट’ या भारतीय चित्रपटाचा समावेश आहे. यापूर्वी ‘आत्मपॅम्फ्लेट’ची 73 वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही निवड झाली होती.

अत्यंत तिरकस विनोदी, आणि मनोरंजक कथा असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन परेश मोकाशी यांनी केले असून यात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित हा निखळ आनंद देणारा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Share This News
error: Content is protected !!