आर्यन खानच्या डेब्यूवर कंगना रणौतची प्रतिक्रिया; शाहरुखच्या मुलाचं कौतुक करत इतरांवर टोमणे

469 0

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच स्टार किड्सवर टीका करताना दिसते, पण यावेळी तिची प्रतिक्रिया सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच लेखक आणि दिग्दर्शक म्हणून डेब्यू करतोय, अशी घोषणा शाहरुखने अलीकडेच केली. आर्यनची वेब सिरीज नेटफ्लिक्सवर येणार असून, ती त्याची आई गौरी खानने प्रोड्यूस केली आहे.

या घोषणेनंतर कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आर्यनबद्दल कौतुक केलं. तिने लिहिलं, “चित्रपट कुटुंबातील मुले केवळ मेकअप लावणे, वजन कमी करणे आणि स्वतःला अभिनेता समजणे यापलीकडे काहीतरी वेगळं करत आहेत, हे पाहून खूप आनंद होतोय. भारतीय सिनेमाचा दर्जा वाढवायची गरज आहे आणि ज्या लोकांकडे संसाधनं आहेत त्यांनी सोपा मार्ग न निवडता वेगळं काहीतरी केलं पाहिजे. आर्यनने लेखक आणि दिग्दर्शक म्हणून जो निर्णय घेतला आहे, तो खूप छान आहे. त्याच्या डेब्यूची खूप उत्सुकता आहे.”

कंगनाची ही प्रतिक्रिया पाहून अनेकांना धक्का बसलाय. कारण ती नेहमीच नेपोटिझमवर टीका करते. मात्र यावेळी तिने आर्यनच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. तिने अप्रत्यक्षपणे काही लोकांना टोमणा मारत म्हटलं की, “वजन कमी करून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारे,” पण ती कोणाबद्दल बोलली हे मात्र स्पष्ट केलं नाही.

कंगनाची ही बदललेली भूमिका अनेक चाहत्यांना आवडली असून, आर्यनबद्दल तिच्या सकारात्मक प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा होत आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!