Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्याप्रकरणात मुलगी मानसी देसाईने केले खळबळजनक आरोप

990 0

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्टला एनडी स्टूडिओत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 5  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात नितीन देसाई यांची मोठी मुलगी मानसी देसाईने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात तिने संबंधित कंपनीने खोटी आश्वासन दिल्याचा आरोप केला आहे. याचसोबत वडिलांचा फसवणूक करण्याचा कोणताच उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.

मानसी देसाईने एएनआयशी बोलताना सांगितले की, वडील नितीन देसाईवर कर्जाची रक्कम 181 कोटी रुपये होती. त्यापैकी आम्ही 86.31 कोटी रुपये भरले होते. फेब्रुवारी 2020 पर्यंत सर्व देयके देण्यात आली होती. तसेच वडिलांचा कुणालाही फसवण्याचा उद्देश नव्हता,अशी माहिती मानसीने दिली आहे. तसेच माझ्या निवेदनाचा इतकाच उद्देश आहे की, नितीन देसाई यांच्या संबंधित अफवांना आळा घालणे, लोकांना चुकीची माहिती पसरवणे थांबवणे आणि जगासमोर सत्य समोर आणणे असे असल्याचे मानसीने सांगितले.

तसेच मानसी पुढे म्हणाली 2020 साठी आलेल्या कोरोना महामारीचा संपूर्ण जगाला धक्का बसला होता. बॉलिवूडलाही याचा मोठा फटका बसला. कारण त्यावेळी कोणतीच कामे सूरू नव्हते आणि स्टूडिओ देखील बंद होते. त्यामुळे वडिलांना नियमीत कर्जाचे हफ्ते भरता येत नव्हते, हफ्ते भरण्यास विलंब होत होता. त्यामुळे या सर्व प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी नितीन देसाई यांनी कपंनीला वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यांच्याकडील रक्कम त्यांना पुन्हा परत करता येईल. पण कंपनीने त्यांना खोटे आश्वासन देऊन बाजूने कायदेशीर कारवाई सुरू केल्याचा आरोप मानसी देसाईकडून करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!