Baap Manus

Baap Manus Trailer : अनुषा दांडेकर करणार मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटाद्वारे येणार भेटीला

777 0

‘मुलीच्या आयुष्यातील तिचा पहिला हिरो हा बाप असतो..’ या कथाविश्वाभोवती गुंफलेल्या बापमाणूस चित्रपटाचा ट्रेलर (Baap Manus Trailer) नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘फादर्स डे’ रोजी या चित्रपटाचं (Baap Manus Trailer) पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्याला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. बाप आणि मुलीच्या नात्याची मनाला स्पर्श करणारी एक सुंदर गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी भेटीला येणार आहे.

अनुषा दांडेकर करणार पदार्पण
अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात (Baap Manus Trailer) वडीलांची भूमिका साकारली आहे तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनुष्का दांडेकर मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.एकटा बाप मुलीचा सांभाळ करू शकत नाही या समाजाच्या मानसिकतेला चोख उत्तर ‘बापमाणूस’ या चित्रपटातून देण्यात आलं आहे.

‘बापमाणूस’ या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश फुलपगारे यांनी केले आहे. आनंद पंडित,रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे तर वैशल शाह,राहुल दुबे चित्रपटाचे सह-निर्माते आहे. पुष्कर जोग,किया इंगळे व्यतिरिक्त अनुषा दांडेकर,कुशल बद्रिके,शुभांगी गोखले यांनीदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सोपान पुरंदरे चित्रपटाचे छायाचित्रकार आहेत तर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी रवी झिंगाडे यांनी सांभाळली आहे.

Share This News
error: Content is protected !!