Animal Trailer

Animal Trailer : बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर रिलीज

747 0

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे रणबीरच्या अ‍ॅनिमल सिनेमाची (Animal Trailer). तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज याचा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटाचा ट्रेलर केला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमात भली मोठी स्टार कास्ट आहे. मुख्य म्हणजे रश्मिका मंदाना आणि रणबीर पहिल्यांदाच या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमात रणबीर आणि रश्मिका मुख्य भूमिकेत आहेत.

तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त दिग्दर्शनामुळे हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत होता. आता त्याच्या ट्रेलरची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. हा सिनेमा वडिल मुलाच्या नात्याभोवती फिरतो. अनिल कपूर रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात अर्जून सिंह म्हणजेच रणबीर त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करत असतो. मात्र त्याचे वडिल बलबीर सिंह नेमहीच रागिष्ट स्वभावाचे दिसत आहेत. मात्र या सगळ्याचा मुलावर काहीच फरक पडत नाही. त्याच्यासाठी त्याचे वडिल म्हणजे सुपर हिरो असतात.

या सिनेमात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. जरी तो या संपुर्ण ट्रेलरमध्ये फार कमी वेळ दिसत असला तरी त्याची रणबीर पेक्षा चर्चा होताना दिसत आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा 1 डिसेंबरला सर्वत्र रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!