मुंबई : रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाध्यांनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी (Ameen Sayani Pass Away) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. अमीन सयानी यांना आज सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रेडिओवर 1952 साली सुरु झालेल्या ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास 65 हजार पत्रं यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त 7 गाणी होती. ही संख्या नंतर 16 पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सयानी दिवसाला 12 तास काम करायचे. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले धन्यवाद; विधिमंडळात नेमकं काय घडलं?
IPL 2024 : अखेर ठरलं ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा 17 वा सिझन
Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा
HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम