साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) याला पोलिसांनी आज राहत्या घरून अटक केली. त्याच्या या अटकेची बातमी व्हायरल होताच चाहत्यांकडून टीका केली जात आहे. मात्र अल्लू अर्जुन ला अटक नेमकी कशासाठी केली ? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुन याला जामीन मंजूर झाला आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी आणि तपास पोलिसांकडून अजूनही सुरू आहे.
अटक कशासाठी ?
4 डिसेंबर रोजी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा ब्लॉकबस्टर “पुष्पा” या चित्रपटाचा सिक्वेल अर्थात “पुष्पा 2” (PUSHPA 2) चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रीनिंग दरम्यान अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. ज्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने या महिलेच्या कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं. त्याबरोबरच आपल्या “X” या प्लॅटफॉर्म वर एक व्हिडिओ पोस्ट करून माफीदेखील मागितली होती.
याच स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या घटनेच्या संदर्भात अल्लू अर्जुन याला आज अटक करण्यात आली. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनसह थिएटरच्या मॅनेजरच्या विरोधात तक्रार दाखल केली. कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी थिएटरचा मालक, मॅनेजर आणि आता अखेर अल्लू अर्जुन यालाही अटक करण्यात आली होती.
शिक्षा काय होणार ?
ज्या कलमान्तर्गत अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच अनुषंगाने तो दोषी आढळल्यास त्याला शिक्षा देखील होईल. कलम 118 (1) मध्ये दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय 20 हजार रुपयांचा दंड ही भरावा लागू शकतो. तर कलम 105 नुसार दोषी आढळलेल्या व्यक्तीला किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अल्लू अर्जुन याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाल्यास आणि त्याला की मोठी शिक्षण झाल्यास चाहत्यांना मोठा धक्का बसेल.