आलियानंतर आता बिपाशाच्या घरी देखील चिमुकलीचे स्वागत, गोंडस मुलीला दिला जन्म

313 0

मुंबई : बिपाशा बासुने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. वयाच्या 43 व्या वर्षी बिपाशा आई झाली आहे. बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या घरी आता गोंडस मुलीच्या स्वागताची तयारी केली जाते आहे. नुकतीच आलिया भट आणि रणबीर कपूर यांना देखील कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये दोन नवीन स्टार किड्सची एन्ट्री झाली आहे.

बिपाशा आणि करण सिंग ग्रोवर यांनी 2016 मध्ये लग्न केलं होतं. ऑगस्टमध्ये बिपाशाने आपण आई होणार असल्याचं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर देखील तिने मॅटरनिटी शूट मधून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून आपल्या चहात्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं. मुलीच्या जन्माच्या माहितीनंतर तिच्या चाहत्यांनी बिपाशा आणि करण सिंग रोडवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!