प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार‘आदिपुरुष’चा ट्रेलर
पुणे : रामायणावर आधारित असलेला प्रभास आणि क्रीती सेनॉन स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’ची सिने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा होत आहे. हा चित्रपट येत्या 16 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. लोक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर पासूनच चर्चेत आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्या ट्रेलरवरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. यानंतर आता या चित्रपटाचा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर 9 मे 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’च्या टीमने या मेगा लॉन्च इव्हेंटची घोषणा करणारे पॅन इंडिया स्टार प्रभासचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर एकाच वेळी 70 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर केवळ भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, फिलीपिन्स, म्यानमार, श्रीलंका, जपान, आफ्रिका, यूके, युरोप, रशिया, इजिप्त आणि दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये लाँच केला जाणार आहे.
आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रीमियरसाठी निवड झाल्यामुळे लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, अमिताभ बच्चन, सैफ अली खान, काजोल आणि देवदत्त नागे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
