Aadipurush Movie

जय श्रीरामच्या जयघोषात आदिपुरुषचा अ‍ॅक्शन ट्रेलर रिलीज (Video)

433 0

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (South actor Prabhas), अभिनेत्री कृती सेनन (Actress Kriti Sanon) आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट (Adipurush Movie) मागच्या 1 वर्षांपासून चर्चेत आहेत. हा चित्रपट प्रचंड वादात सापडला होता. आता हा चित्रपट 16 जून रोजी संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर (Trailer) आज प्रदर्शित झाला आहे. याआधी या चित्रपटाचा एक ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. आताच्या ट्रेलरमध्ये प्रचंड अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे. या स्पेशल ट्रेलरसाठी तिरुपती या ठिकाणी एक मेगा इव्हेंट भरवण्यात आला होता. यासाठी तरुणांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हा ट्रेलर 2 मिनिटं 27 सेकंदाचा आहे. अ‍ॅक्शनने भरलेल्या या ट्रेलरमध्ये प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाची झलक दाखवण्यात आली आहे. सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी तिरुपतीमध्ये तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी तरुणाई सिनेमातील जय श्री राम जय श्रीराम या गाण्यावर थिरकताना दिसली.

अभिनेता प्रभासची साऊथमध्ये किती क्रेझ आहे हे यावेळी पुन्हा एकदा दिसून आले. ट्रेलरसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला होता. इतकंच नाही तर आदिपुरूषच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक शोला प्रत्येक ठिकाणी एक सीट रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निकामी सीट भगवान हनुमान यांच्यासाठी असणार आहे. या सिनेमाचे एकूण बजेट (Budget) 500 कोटी रुपये आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होणार की फ्लॉप, हे येणाऱ्या काळात समजेलच.

Share This News
error: Content is protected !!