Poonam Pandey

Poonam Pandey : अभिनेत्री पुनम पांडेने अप्सरा आली गाण्यावर धरला ठेका

1239 0

प्रसिद्ध अभिनेत्री पुनम पांडे (Poonam Pandey) ही आपल्या अदांच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ करत असते. पूनमचा (Poonam Pandey) मोठा चाहता वर्ग असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्री पुनम पांडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमी आपले हॉट फोटो आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. अभिनेत्री पुनम पांडे हिने मराठी गाण्यावर डान्स केला असून तिने या डान्सचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

अभिनेत्री पुनम पांडेचे इंस्टाग्रामवर तिचे 1 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. यावेळी तिने ऑरेंज रंगाच्या आऊटफिटमध्ये मराठीतील प्रसिद्ध गाणे अप्सरा आली वर डान्स केला आहे. यावेळी तिने केस मोकळे सोडले असून डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. पुनमच्या अदांवर नेटकरी फिदा झाले असून अनेकांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!