Aatmapamphlet Movie

Aatmapamphlet Trailer : आपल्या बालपणीच्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर रिलीज

803 0

अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर (Aatmapamphlet Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. यामध्ये एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र पाहायला मिळणार आहे. हा ट्रेलर पाहिल्यावर नक्कीच तुमचे बालपणीचे प्रेम आठवल्याशिवाय राहणार नाही. हा चित्रपट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आशिष अविनाश बेंडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. नुकताच अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात आत्मपॅम्फ्लेटचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला.

या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज ‘आत्मपॅम्फ्लेट’चे निर्माते आहेत. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!