मनोरंजन

National Film Awards : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री

मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराला (National Film Awards) आज सायंकाळी 5 वाजता सुरुवात झाली आहे. नॅशनल मीडिया सेन्टर, नवी दिल्ली या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी नामांकन मिळाले आहे. तुम्ही PBI च्या फेसबूकपेजवर देखील हा कार्यक्रम लाइव्ह पाहू शकता.

Press Release – 69th National Film Awards

पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी
RRR या चित्रपटाच्या तेलगू भाषेच्या व्हर्जनला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे.
रॉकेट्री या चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
विकी कौशलचा सरदार उधम सिंह चित्रपट सर्वोत्तम हिंदी सिनेमा ठरला आहे.
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार; सर्वोत्कृष्ट संवाद लेखक आणि एडिटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ‘एकदा काय झालं’
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मिमी चित्रपटासाठी क्रिती सेननला राष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गोदावरी सिनेमासाठी निखिल महाजन यांना राष्ट्रीय पुरस्कार
एस.एस राजमौली यांच्या RRR चित्रपटाला बेस्ट स्टंट, बेस्ट म्युझिक डायरेक्शन, बेस्ट नृत्यदिग्दर्शक, बेस्ट स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर पुरस्कार