…अखेर ‘इतके’ पैसे मोजत एलॉन मस्क यांनी खरेदी केलं ट्विटर

509 0

सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेलं ट्विटर जगभर लोकप्रिय आहे. मात्र, जगातील या सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची विक्री झाली आहे.

44 अब्ज डॉलर मध्ये हा करार पार पडला आहे. एलॉन मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी संध्याकाळी उशिरा ही ऑफर स्वीकारली आहे. ट्विटरवरून माहिती देताना टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले आहे की मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरचा करार केला आहे.

Share This News
error: Content is protected !!