मुंबई- कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाचे अनेक पोस्टर, टिझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. धर्मवीर या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रचंड गाजला होता. काल १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.७५ ते १.९० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप या चित्रपटाच्या कमाईचा खरा आकडा समोर आलेला नाही.
Dharmaveer Day 1 Night Occupancy: 43.18% (Marathi) (2D)
#Dharmaveer
https://t.co/707cNPCAoB— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) May 13, 2022
अनेक तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट विकेंडला आणखी चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच हा चित्रपट लवकरच १० कोटींचा टप्पा पार करेल असेही म्हटलं जात आहे.