पुणे- भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच विनायक आंबेकर यांनी शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याचाच राग मनात धरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विनायक आंबेकर यांच्याविरोधात यापूर्वी तक्रारही दिली होती. दरम्यान विनायक आंबेकर हे बालगंधर्व रंगमंदिर येथे आज संध्याकाळी साडेसहा वाजता पत्रकारांशी संवाद साधून आपली बाजू मांडणार आहेत.
आजच अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या पोस्टनंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याने भविष्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.