TOP NEWS SPECIAL ! भारतीय रेल्वेतील पहिल्या व एकमेव मशिनिस्ट असलेल्या महिलेची यशोगाथा… पाहा VIDEO

366 0

21 व्या शतकात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया देखील खंबीरपणे कार्यरत आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रिया कर्तृत्ववान ठरतात. भारतीय रेल्वेतील पहिल्या व एकमेव मशिनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या शिवानी शिवराज कुमार या देखील त्यापैकीच एक…

भारतीय रेल्वेतील पहिल्या व एकमेव मशिनिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या शिवानी शिवराज कुमार यांच्या जीवनातील संघर्ष आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हे काम मी केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी करते, असं अभिमानानं सांगणाऱ्या या 50 वर्षीय महिलेच्या कर्तृत्त्वाचा Top News मराठीनं घेतलेला हा विशेष आढावा…

आपल्या भारत देशात शिवानी कुमार यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान महिला आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील प्रत्येक महिलेची यशोगाथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मी देशासाठी काम करते, असं स्वाभिमानानं सांगणाऱ्या शिवानी शिवराज कुमार यांच्या देशाभिमानाला Top News मराठीचा सलाम !

Share This News
error: Content is protected !!