parag-karandikar

Parag Karandikar : कौतुकास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

607 0

पुणे : ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर (Parag Karandikar) यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संपादक या वर्गवारीतून ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’चे सदस्य बनणारे करंदीकर हे मराठी वृत्तपत्राचे दुसरे संपादक ठरले आहेत. पराग करंदीकर यांच्या अगोदर या पदावर 1980 मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर यांची निवड झाली होती.

Chandrayaan-3 : ठरलं ! 14 जुलैला होणार चांद्रयान -3 चं प्रक्षेपण

‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती होणे, ही पत्रकारांच्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद बाब समजली जाते. या पदावर आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातून 8 मराठी व्यक्ती ‘प्रेस कौन्सिल’च्या सदस्य बनल्या आहेत. संपादक पराग करंदीकर यांच्या अगोदर वृत्तपत्राचे मालक या वर्गवारीतून यापूर्वी ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर; तसेच ‘लोकमत’चे विजय दर्डा हे सदस्य राहिले होते, तर ‘श्रमिक पत्रकार’ या वर्गवारीतून अनंत बागाईतकर आणि विजय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ या वर्गवारीतून ‘सकाळ’चे प्रतापराव पवार आणि राजीव साबडे यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता संपादक या वर्गवारीतून करंदीकर (Parag Karandikar) यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी निवड झाली आहे.

Viral Video : धक्कादायक ! सुनेने सासऱ्याला रस्त्यावर पळवून पळवून हाणलं; Video आला समोर

पराग करंदीकर हे मागच्या तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात क्रीडा, राजकारण, समाजकारण, संरक्षण अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!