ईएसआयसी (कामगार राज्य विमा महामंडळ ) एससी एसटी कर्मचारी व अधिकारी संघटना, पुणे यांच्या वतीने आयोजित भीम जयंती – 2023 कार्यक्रमाचे उदघाटन उप संचालक श्री राजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसंचालक वित्त सी आर पाटील, सहायक संचालक सुनील देडे व इतर कर्मचारी – अधिकारी उपस्थित होते. भीम जयंती -2023 या उपक्रमाअंतर्गत व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, निबंध स्पर्धा, क्वीझ कंपेटिशन,कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ तसेच लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 31 मार्च पासून ते 9 एप्रिल पर्यंत चालतील.संघटनेने 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी बक्षीस वितरण सोहळा व सामाजिक दायित्व म्हणून संघटनेतर्फे वंचित लोकांना काही मदत केली जाईल.
या प्रसंगी बोलताना राजेश सिंह यांनी बाबासाहेबांनी राष्ट्रनिर्माणासाठी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला ईएसआयसीचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.