Covid Strain

Covid Strain : WHO कडून नवा स्ट्रेन ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित!

589 0

तब्बल 2 वर्ष कोरोनाचा (Covid Strain) सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचे जनजीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये (Covid Strain) पुन्हा एकदा कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घालायला सुरुवात केली आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलं आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची माहिती दिली आहे.

31 जुलै रोजी युनायटेड किंगडममध्ये हा स्ट्रेन आढळून आला होता. त्यानंतर दररोज नवीन प्रकरणं सतत समोर येत आहेत. अशातच आता WHO ने EG.5 या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट ( variant of interest ) म्हणून जाहीर केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नेमके काय म्हंटले?
सध्या कोरोनाचा हा स्ट्रेन अमेरिका, यूके आणि चीनमध्ये पसरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलंय की, हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक धोकादायक नाही आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या कुटुंबातील असल्याने त्याची लक्षणं ही कोरोनाच्या जुन्या प्रकारांसारखीच आहेत.

नव्या व्हेरिएंटची लक्षणं पुढीलप्रमाणे ?
नाक गळणं
डोकेदुखी
सतत थकवा वाटणं
शिंका येणं
घसा खवखवणं

Share This News
error: Content is protected !!