क्राईमराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीयव्हिडिओ

Train Viral Video : महिलांची लोकल ट्रेनमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; लाथा- बुक्क्यांनी केली मारहाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हजारोंच्या संख्येने अनेक प्रवासी रोज लोकल ट्रेनमधून (Train Viral Video) प्रवास करत असतात. यामध्ये एका छोट्याशा कारणामुळे भांडण झाल्याचे आपण पाहिले असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल (Train Viral Video) होत आहे यामध्ये लोकलमध्ये काही महिलांची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे. या महिला एकमेकांना पार लाथा- बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.

R Ashwin : अश्विननं टेस्टमध्ये अनेक विक्रम मोडत रचला इतिहास

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकल ट्रेनच्या महिला डब्यात महिलांच्या एका गटाने आपापसात मारामारी सुरू केली. व्हिडिओमध्ये महिला ओरडताना, धक्काबुक्की करताना आणि चप्पलने एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. मात्र हे भांडण नेमके कशामुळे झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Light : कुणी लाईट देता का लाईट? वर्ध्याच्या पठ्ठ्याचा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन…

हा महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ @Ayushihihaha नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ  अनेक लोक कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कोलकातामधील असल्याचे समोर आले आहे.