पुढील काही तासांमध्ये चंद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल. 23 सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग करणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरणार आहे. या मोहिमेचे सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चला तर मग या वैज्ञानिकांबद्दल जाणून घेवुयात…
1) एस. सोमनाथ (S Somanath) :
इस्रोचे अध्यक्ष असलेले एस. सोमथान हे चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. एस. सोमनाथ यांनी या मोहिमेसाठी फार मेहनत घेतली आहे. यापूर्वी एस. सोमनाथ यांनी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि तरल प्रणोद प्रणाली केंद्र- अंतराळ संशोधन या रॉकेटसंदर्भातील प्राथमिक विकास केंद्रांचे निर्देशक म्हणून काम पाहिलं आहे. एस. सोमनाथ यांनी इस्रोचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चांद्रयान-3, आदित्य एल 1 (सोलार मिशन) आणि गगनयानसारख्या महत्त्वाच्या मोहिमांना गती मिळाली आहे.
2) पी. वीरमुथुवेल (P Veeramuthuvel) :
पी. वीरमुथुवेल हे इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेचे परियोजना निर्देशक आहेत. त्यांनी 2019 रोजी चांद्रयान-3 मोहिमेच्या निर्देशक पदाचा कारभार पदभार स्वीकारला होता. पी. वीरमुथुवेल हे सध्या इस्रोच्या मुख्य कार्यालयामधील स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रामसाठी उप-निर्देशक म्हणून काम पाहत आहेत. पी. वीरमुथुवेल यांनी चांद्रयान-2 मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
3) मोहन कुमार (Mohan Kumar):
चांद्रयान-3 मोहिमेचे निर्देशक म्हणून मोहन कुमार काम पाहत आहेत. मोहन कुमार हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील वरिष्ठ वैज्ञानिक आहेत.मोहन कुमार यांनी यापूर्वी एलव्हीएम3-एम3 मोहिमेअंतर्गत वन वेब इंडिया 2 उपग्रहांचं यशस्वी उड्डाण करण्यासाठी निर्देशक म्हणून काम पाहिलं होतं.
4) एम. शंकरन (M Sankaran) :
एम. शंकरन हे यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरचे निर्देशक आहेत. हे केंद्र इस्रोसाठी सर्व उपग्रहांची निर्मिती करण्याचं काम करतं. हे काम एम. शंकरन यांच्या देखरेखीखाली होतं. सध्या एम. शंकरन हे सध्या त्या टीमला मार्गदर्शन करत आहेत जी टीम भारताला आवश्यक असलेल्या उपग्रहांची निर्मिती करते.
5) एस. उन्नीकृष्णन नायर (S Unnikrishnan Nair) :
एस. उन्नीकृष्णन नायर हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे निर्देशक आहेत. चांद्रयान-3 अवकाशामध्ये लॉन्च करण्यामध्ये जियोसिंक्रोनस सैटेलाइट लॉन्च व्हीकल (GSLV) मार्क-III म्हणजेच लॉन्च व्हीकल मार्क-III च्या निर्मितीमध्ये एस. उन्नीकृष्णन नायर यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
6) रितू कारिधाल ( Ritu Karidhal) :
रितू कारिधाल यांना ‘रॉकेट वुमन’ म्हणून ओखळले जाते. रितू कारिधाल या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या.त्यांनी चंद्रयान-3 मध्ये मिशन डायरेक्टर म्ह्णून काम पाहिले आहे.