महागाईपासून लोकांना वाचविण्याची गरज – राहुल गांधी

197 0

आगामी काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा काँग्रेस  नेते राहुल गांधी  यांनी शनिवारी जनतेला दिला आहे. सरकारने जनतेला महागाईपासून वाचवावे व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, महागाई हा सर्व भारतीयांवर कर आहे, ज्यांच्या विक्रमी वाढीमुळे रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होण्यापूर्वीच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांच्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आणि कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक किंमत-आधारित महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली.

यापूर्वी पाच राज्यांमध्ये काॅंग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतरही राहुल यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एफडी, पीपीएफ, ईपीएफ आणि महागाईशी संबंधित आपल्या ट्विटमध्ये जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. FD – 5.1 टक्के, PPF – 7.1 टक्के, EPF – 8.1 टक्के, किरकोळ महागाई – 6.07 टक्के आणि घाऊक महागाई – 13.11 टक्के.

Share This News
error: Content is protected !!