NIA

NIA कार्यालयावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; अलर्ट जारी

322 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. या संघटनांकडून पोलिसांच्या घरांना लक्ष्य करण्यात येणार आहे तसेच एनआयएच्या कार्यालयावर देखील दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाची माहिती हाती लागली आहे. या माहितीनुसार लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांना लक्ष्य करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. ISI च्या इशार्‍यावर, भारतविरोधी लॉबी गट आणि कट्टरपंथी घटक जम्मू आणि काश्मीरमध्ये G20 आयोजित करण्याच्या विरोधात प्रत्येक पाऊल उचलत असल्याचे एका केंद्रीय गुप्तचर अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

मागच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील भीमबेर गली-सुरनकोट रस्त्यावरील भट्टा दुरियनजवळ दहशतवाद्यांनी ट्रकवर हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. यानंतर या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदची पाकिस्तानस्थित शाखा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने घेतली होती. या हल्ल्यानंतर काही दिवसांनी राजौरीमध्ये अजून एक दहशतवादी हल्ला झाला यामध्येदेखील लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते.

Share This News
error: Content is protected !!