Healthखेळराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीयलाईफ स्टाईल

शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मिळाली मान्यता; ‘या’ देशात पार पडणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वीडनमध्ये (Sweden) शारीरिक संबंधांना (Physical Relationship) खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर या देशाने पहिल्या सेक्स चॅम्पियनशिपची (Sex Championship) घोषणादेखील केली आहे. गोटेन्बर्ग या शहरात ही चॅम्पियनशिप पार पडणार आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशन (Swedish Sex Federation) ही संस्था पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.

कशी असेल स्पर्धा?
युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप 8 जून 2023 रोजी सुरू होणार आहे. जी काही आठवडे चालेल. यामध्ये स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. सहभागी स्पर्धकांना सामने किंवा अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी 45 मिनिटे ते 1 तास वेळ देण्यात येणार आहे.

कशाकशाचा असेल समावेश?
सेक्स चॅम्पियनशिपचे स्पर्धक 16 विषयांमध्ये स्पर्धा करतील. ज्यात सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात सक्रिय जोडपं यासारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांनी निवड तीन परिक्षक आणि प्रेक्षकांचे रेटिंग एकत्र करून करण्यात येणार आहे. यामध्ये परिक्षकांची मतं 30 टक्के असतील तर 70 टक्के जनतेचं रेटिंग असणार आहे. या एकत्रित निर्णयाच्या आधारावर विजेते निवडण्यात येणार आहे.