रशिया-युक्रेन युद्ध : खारकीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

466 0

युक्रेनमधील खारकीव शहरात रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आठ फ्लाईट भारतात आल्या आहेत. सोमवारी सकाळी आठवी फ्लाईट बुडापेस्टहून दिल्लीत दाखल झाली. यात 218 भारतीय नागरीक होते.

तसेच नवव्या फ्लाईटने उड्डाण घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दिली. ‘ANI’या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यूएसच्या Maxar Technologies नावाच्या एका खासगी कंपनीने कीव्हच्या वेशीपर्यंत पोहोचलेल्या रशियाच्या सैन्य ताफ्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

 

जवळपास 64 किलोमीटर लांबीचा हा ताफा आहे. युक्रेनविरूद्ध युद्धाची सुरुवात केल्यापासूनचा हा सर्वात मोठा सैन्य ताफा आहे. याआधी रशियाने 27 किलोमीटर लांबीचा सैन्य ताफा पाठवला होता. नव्या सैन्य ताफ्यामध्ये शेकडो वाहने असून यात रणगाडे, अर्टलरी गन, हत्यारबंद गाड्या यांचा समावेश आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने आज एक सूचनावली जारी केली आहे.

बस, ट्रेन अथवा मिळेल त्या साधनाने हिंदुस्थानी नागरिकांनी कीव सोडावे असे निर्देश यात देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांमध्ये कीवमध्ये मोठी घडामोड होणार असल्याची चिन्हे आहेत.

Share This News
error: Content is protected !!