Ram Mandir Photo : राम मंदिराचे आतमधील फोटो आले समोर
राम मंदिर उभारणीसाठी (Ram Mandir Photo) श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे निधी समर्पण मोहीम राबवण्यात आली होती. ज्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी निधी दिला होता. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सध्या सोने-चांदी सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले आहे. मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ते पूर्ण होऊ शकतं, असा अंदाज आहे. या तळमजल्यात सागवानाचे 40 दरवाजे, खिडक्या असणार आहेत. या मंदिराचे आतील फोटो (Ram Mandir Photo) आता समोर आले आहेत.







