Rahul gandhi ghoshna

Rahul Gandhi : राजीव गांधींच्या श्रद्धांजली सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या ‘राहुल गांधी अमर रहें’च्या घोषणा!

498 0

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rahul Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्ट रोजी देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. अनेक ठिकाणी राजीव गांधींना श्रद्धांजली (Rahul Gandhi) अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमधील जोधपूर जिल्हा काँग्रेस कमेटीनेही काँग्रेसच्या कार्यालयामध्ये श्रद्धांजली सभा आणि विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये राजस्थान काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गहलोत, पशुधन बोर्डाचे अध्यक्ष राजेंद्र सोलंकी, आमदार आणि माहापौरांसहीत पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात उत्साहाच्या भरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भलत्याच घोषणा दिल्या.

नेमका काय प्रकार घडला ?
श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या फोटोला हार घालून कार्यलयात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चुकून “राहुल गांधी अमर रहे ” कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा फारच चुकल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना घोषणा देण्यापासून रोखलं.

कार्यकर्त्यांनाही आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारत “राजीव गांधी अमर रहें”च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे मात्र काँग्रेस ट्रोल आणि मीमज चा विषय ठरला आहे. हा प्रकार काँग्रेस साठी काही नवीन नाही या आधी सुद्धा राजस्थान मध्ये काँग्रेसच्या एका सभेत कार्यकर्त्यांनी “प्रियंका गांधी जिंदाबाद” च्या ऐवजी “प्रियंका चोप्रा ” झिंदाबाद च्या घोषणा दिल्या होत्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!