Presidential Medals

Presidential Medals : देशातील 954 पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ 76 जणांचा समावेश

957 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 954 पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी राष्ट्रपती पदके (Presidential Medals) जाहीर करण्यात आली. पोलिस दलात (Presidential Medals) केलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील 76 पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके, विनय चौबे, वाहतूक शाखेचे सहआयुक्त प्रवीण पडवळ, उपायुक्त विजय पाटील या मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिससेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्यातील प्रवीण साळुंके, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तर 40 पोलिसांचा गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदके देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये वाहतूक शाखेचे सहआयुक्त प्रवीण पडवळ, उपायुक्त विजय पाटील, राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे.

राज्यातील ३३ पोलिसांना शौर्यपदके जाहीर झाली आहेत. यामध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!