Odisha Malgadi

ओडिशामध्ये पुन्हा रेल्वे अपघात; मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले (Video)

605 0

ओडिशा : ओडिशातील बालासोर दुर्घटनेला तीन दिवस उलटत नाही तोपर्यंत सोमवारी पुन्हा एक रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. बारगढ जिल्ह्यात मेंधापाली या ठिकाणी मालगाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

काय घडले नेमके?
इस्ट कोस्ट रेल्वेने (East Coast Railway) या घटनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, ओडिशातील बारगढ जिल्ह्यातल्या मेंधापालीजवळ एका सिमेंट फॅक्ट्रीकडून चालवण्यात येणाऱ्या मालगाडीचे काही डब्बे फॅक्ट्री परिसरात असलेल्या रुळावरून घसरले. यामध्ये रेल्वेचा काहीही संबंध नाही आहे. तो एक खासगी सिंमेंट कंपनीचा ट्रेन ट्रॅक आहे. कंपनीचा रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅकही आहे. रेल्वेचा याच्याशी काहीच संबंध नाही. तसंच या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!