मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागात एनआयएकडून छापे (NIA Raid) टाकण्यात आले आहेत. 7/11 ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी वाहिद शेख याच्या घरावर एनआयएकडून छापा टाकण्यात आला आहे. 2007 मध्ये ट्रेन स्फोटात वाहिदला अटक करण्यात आली होती. मात्र 2015 मध्ये त्याला न्यायालयानं सर्व दोषापासून मुक्त केले होते. हे छापे टाकण्यासाठी आलेल्या एनआयए, पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. वाहिदनं घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर एनआयएकडून देशभरात छापे टाकण्यात येत आहेत.
एनआयएचे एक पथक मुंबईतील विक्रोळी भागात राहणाऱ्या अब्दुल वाहिद शेखच्या घरी पोहोचले. सकाळी पाच वाजता सुमारास हे पथक अब्दुल वाहिद शेखच्या घरी पोहोचले.यावेळी त्याने पथकाला नोटीस दाखवण्यास सांगितले. यावेळी अब्दुलने दरवाजा उघडला नाही. “ते मला कोणतीही नोटीस दाखवत नाहीत म्हणून मी दार उघडले नाही. यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा तोडला. म्हणून मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. स्थानिक पोलिस इथे आहेत आणि सगळे माझ्या घराला घेराव घालत आहेत असे अब्दुल म्हणाला.
PFI संबंधित प्रकरणात NIA 6 राज्यांमध्ये छापे टाकत आहे. पीएफआय मॉड्यूल नष्ट करण्यासाठी एनआयए महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान एनसीआरसह विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेत आहे.