India vs Bharat Controversy

India vs Bharat Controversy : इंडिया नाही भारत, सरकारी पुस्तिकेत मोदींचा उल्लेख बदलला

1281 0

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रपत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी (India vs Bharat Controversy) प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून राजकीय वाद India vs Bharat Controversy पेटलेला असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. आशियान परिषदेसाठी पीएम मोदी विदेशात जाणार आहे. यावेळी परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदी यांचा प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आशियान बैठकीसाठी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या बैठकीत सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यावर चर्चा होणार आहे. यंदाच्या बैठकीचं अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. आशियानच्या गटामध्ये भारत, चीन, जपान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया यांच्यासह दक्षिण आशियाई देशांचा समावेश आहे. परंतु पीएम मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत त्यांचा उल्लेख प्राईम मिनिस्टर ऑफ भारत म्हणजेच भारताचे पंतप्रधान असा करण्यात आला आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडून कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!