Moon Mission

Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न फक्त 8 मोहिमा यशस्वी; जाणून घ्या जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास?

3004 0

मुंबई : ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहतोय, तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर लँड (Moon Mission) होणार आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अवघ्या देशासाठी पाहिलेलं हे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. चंद्रावर जाण्याचं स्वप्न अनेक देशांनी पाहिलं. चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण चंद्रावर पोहोचण्याच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या.

70 वर्षात 111 चंद्रमोहिमा, फक्त 8 वेळा यश
70 वर्षात जगभरातील देशांनी एकूण 111 चंद्रमोहिमा हाती घेतल्या. या 111 पैकी 66 चंद्रमोहिमा अयशस्वी ठरल्या. तर, 41 मोहिमा पूर्णपणे अपयशी ठरल्या. फक्त 8 चंद्रमोहिमांमध्ये थोडेफार यश मिळाले.

आतापर्यंत ‘या’ देशांनी चंद्रावर जाण्याचा केला प्रयत्न
1998 ते 2023 दरम्यान भारत, अमेरिका, रशिया, जपान, यूरोपीय संघ, चीन आणि इस्त्रायलने चांद्र मोहिमा केल्या. यात इम्पॅक्टर, ऑर्बिटर, लँडर-रोव्हर आणि फ्लायबाय मशीन्स होते. यूरोपचं स्मार्ट-1, जपानचं सेलेन, चीनचं चांगई-1, भारताचं चांद्रयान-1 अमेरिकेच्या लूनर रीकॉनसेंस ऑर्बिटर मिशन यांचा यात समावेश आहे.

आतापर्यंतच्या आव्हानात्मक चांद्रमोहिमा
17 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेने पहिली चांद्रमोहीम आखली, जी अयशस्वी ठरली.
1958 मध्ये अमेरिका आणि सोव्हियत महासंघाने सहा चांद्रमोहिमा आखल्या, ज्या अयशस्वी ठरल्या.
1967 मध्ये अमेरिकेचं सर्वेयर 4 यान चंद्रावर उतरण्यापूर्वीच यानाचा संपर्क तुटला.
1969 ते 1974 सोव्हियत महासंघाचं लुना-15, लुना-18, लुना-23 चंद्रावर कोसळलं.
2019 रोजी भारताचं चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क अखेरच्या क्षणी तुटला.
19 ऑगस्ट 2023 ला रशियाचं लुना-25 चंद्रावर कोसळलं.

2008 पासून आतापर्यंत भारताच्या तीन चांद्र मोहिमा झाल्या आहेत
चांद्रयान-1
28 ऑगस्ट 2008 रोजी मोहीम सुरु झाली.
12 नोव्हेंबर 2008 रोजी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत दाखल झालं.
सुमारे 77 दिवसांचा कालावधी लागला.

चांद्रयान-2
त्यानंतर 22 जुलै 2019 चांद्रयान-2 मोहीम सुरु झाली.
6 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज झाला.
चांद्रयान-2 मोहिमेला 48 दिवस लागले होते. पण, नंतर त्याचा संपर्क तुटला आणि ही मोहिम अयशस्वी ठरली.

चांद्रयान-3
2023 म्हणजे चालू वर्षात नव्या उमेदीने चांद्रयान-3 चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झालं.
14 जुलै दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेपावलं.
5 ऑगस्ट रोजी लॅण्डरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चांद्रयान-3 लँडिंगसाठी सज्ज झालं आहे.
चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान-3 ला 40 दिवस लागतील.

Share This News
error: Content is protected !!