दीपिकाच्या भगव्या बिकनी वादावर मिलिंद सोमणचे मत; म्हणाला, “ही कला की अश्लीलता याचा विचार…!”

560 0

मुंबई : नुकताच पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने देशभरात धुमाकूळ घातला आहे. या गाण्यांमध्ये दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वात बोर्ड दाखवला आहे. तर चार वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या किंग खानसाठी देखील त्याचे चाहते खुश आहेत. एका बाजूला बेशरम रंग हे गाणं चहात्यांना प्रचंड आवडल आहे. या गाण्यांमध्ये दीपिका आणि शाहरुख या दोघांचाही लुक अनेकांना आवडला आहे. तर अनेकांनी दीपिकाच्या लुकवर मात्र प्रचंड आक्षेप घेतला आहे. यामध्ये अश्लीलता आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो आहे तो म्हणजे दीपिकाची भगव्या रंगाची बिकनी…

या गाण्यावर आणि दीपिकाच्या या भगव्या बिकनीवर अनेकांनी आपले मत मांडले आहे. यामध्ये आता अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण याने देखील उडी घेतली आहे. तो म्हणाला की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला पाहिजे आणि प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. जर त्यांनी काही आक्षेपार्ह म्हटलं असेल तर त्यावर कायदा निर्णय घेईल. 1995 मध्ये मिलिंदने त्याची गर्लफ्रेंड असलेल्या मधु सप्रे या मॉडेल सोबत न्यूड फोटोशूट केलं होतं.

See the source image

त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता. यावर मिलिंद सोमण म्हणाला की, “ही कला ही अश्लीलता याचा विचार कोर्ट करणार… हा मुद्दा सोडवला पाहिजे , माझ्या आयुष्यातील 14 वर्षे यात गेली आहेत.

Share This News
error: Content is protected !!