नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना सभागृहात घुसखोरी (Loksabha Security Breach) केल्यानं सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. आता या प्रकरणी संसद भवनाच्या 7 सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. संसदेत तरुणांच्या घुसखोरीनंतर सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे.
काय घडले होते?
काल दुपारच्या सुमारास संसदेचे कामकाज सुरु असताना दोन तरुणांनी संसदेच्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत आत स्मोक कँडल लावल्या होत्या. तर दोघांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत स्मोक कँडल पेटवल्या. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
उच्च स्तरीय समितीची स्थापना
संसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली असून उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी सी आर पी एफ महासंचालक अनिश दयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या बाहेरील थराच्या सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे असते.CRPF चे जवान शस्त्रास्त्रांसह संसद भवन संकुलात असतात. ते संसद भवनात प्रवेश करत नाहीत. संसदेच्या सुरक्षेशी निगडीत प्रत्येक योजना इतर एजन्सींसोबत तयार करण्यात CRPF ही आघाडीची संस्था आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग
Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी
Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश
Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग