Rahul Gandhi

Rahul Gandhi : अखेर ! राहुल गांधींना खासदारकी बहाल

610 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून यासंबधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची लोकसभेच्या सचिवालयाकडून आज पडताळणी करण्यात आली. यानंतर खासदारकीबदद्ल (Rahul Gandhi) अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

का काढून घेण्यात आली होती खासदारकी ?
मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांची संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठीचे कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या लोकसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे आमने – सामने येऊ शकतात.

Share This News
error: Content is protected !!