DK Shivkumar

Karnataka Election Results 2023 : निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचे किंगमेकर डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर (Video)

397 0

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता राखली आहे. काँग्रेसच्या या विजयात शिल्पकार म्हणून डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांना ओळखले जाते. या विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे किंगमेकर डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. तसेच त्यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांना दिले आहे.

काय म्हणाले डीके शिवकुमार ?
काँग्रेसच्या विजयानंतर डीके शिवकुमार म्हणाले मी आपल्या कार्यकर्ते आणि पक्षातील सर्व नेत्यांना या विजयाचं श्रेय देत आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत केली आणि काम केलं. आज लोकांनी खोट्याचा पर्दाफाश केला आहे. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजय होणार असं आश्वासन दिलं होतं. मी हे विसरू शकत नाही, सोनिया गांधी या मला भेटायला जेलमध्ये आल्या होत्या, त्यावेळी मी पदावर राहण्यापेक्षा जेलमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, असे म्हणत शिवकुमार यांना आपले अश्रू अनावर झाले.

कोण आहे डिके शिवकुमार?
डीके शिवकुमार कर्नाटकमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. कनकपूरा सीटमधून सातत्याने 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत त्यांनी फक्त एक दिवस प्रचार केला आणि ते 1 लाखांच्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे सतत 8 वेळा आमदार झालेले डीके कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!