video

भाजप आमदाराच्या गाडीतून EVM मशीन जप्त; कर्नाटक निवडणुकीमधील धक्कादायक प्रकार (Video)

410 0

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचे (Karnataka Election) मतदान काल पार पडले. या निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात 224 जागांसाठीचं मतदान पार पडलं. त्यानंतर आता येत्या 13 मे ला मतमोजणी केली जाणार आहे. या सगळ्यामध्ये आता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीदरम्यान एका भाजपच्या (BJP) आमदाराच्या गाडीतून EVM मशीन जप्त करण्यात आली.

ही गोष्ट लक्षात येताच तिकडच्या जनतेने या मशीनची तोडफोड करून आपला निषेध व्यक्त केला आहे. या सगळ्या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. या संदर्भात एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. काँग्रेसच्या खासदार डॉली शर्मा (Congress MP Dolly Sharma) यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे EVM मशीन पुन्हा चर्चेत आली आहे.दरम्यान, हा व्हिडीओ कर्नाटकातील कोणत्या भागातला आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!