Karnatak News

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

1196 0

बंगळुरू: वृत्तसंस्था – कर्नाटकच्या (Karnatak News) चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शाळेच्या सहलीत विद्यार्थ्याचं चुंबन घेतल्याचा आणि त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या मुख्याध्यापिकेवर करण्यात आला आहे. शाळेतीलच एका विद्यार्थ्यानं मुख्याध्यापिकेचे फोटो आणि व्हिडीओ चित्रित केले. ते व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ उडाली होती.

मुख्याध्यापिका विद्यार्थ्याचं चुंबन घेत असल्याचे, त्याच्याशी गैरवर्तन करत असल्याचे फोटो बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर विद्यार्थ्याचे आई, वडील शाळेत पोहोचले. त्यांनी मुख्याध्यापिकेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर चिक्काबल्लापूरचे शिक्षण उपसंचालकांची या प्रकरणाची दखल घेत त्यांनी तपासाचे आदेश दिले. यानंतर मुख्याध्यापिकेनं शाळेच्या सहलीत काढलेले काही फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले.

डिलीट करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ रिस्टोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास करुन बीईओंनी अहवाल सादर केला. यानंतर मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!