Imran Khan

Imran Khan : इमरान खान यांची अटक अवैध; पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

355 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना दोन दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये इमरान खान यांची अटक अवैध असल्याचे जाहीर करण्यात आले.

“इमरान खान यांना कोर्टात हजर करा”
न्यायालय परिसरातून कुणाला अटक करणं योग्य नाही. त्यामुळे पुढच्या एक तासात इमरान खान यांना न्यायालयात दाखल करण्यात यावं, असे आदेश न्यायलयाकडून देण्यात आले. त्याचबरोबर जेव्हा इमरान खान यांना न्यायालयात आणलं जाईल तेव्हा राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती.

हा तर न्यायालयाचा अपमान!
कोर्ट परिसरातून इमरान खान यांना अटक करण्यात आली. हि अटक म्हणजे न्यायालयाचा अपमान आहे. इमरान खान यांना अशी अटक करून एनएबीकडून न्यायालयाचा अवमान केला आहे. तसेच कोर्टातून कुणाला अटक कशी-काय करता येईल, असा सवालदेखील पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of Pakistan) एनएबीला (NAB) विचारला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!