Chandrayaan-3

Chandrayaan-3 : विजयी भव: चंद्र भेटीची घटिका आली समीप ! इस्रोचे नवीन ट्विट

1241 0

भारताच्या चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 14 जुलैला सुरू झालेली ही मोहीम आता यशाच्या अंतिम टप्प्यात आहे. विक्रम लँडर प्रत्यक्षात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतानाचा क्षण आणि त्यानंतरच्या कामगिरीची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

चांद्रयान 3 मोहीम सुरू झाल्यापासून अनेक अवघड टप्पे या मोहिमेने पूर्ण केले आहेत. आता अखेरचा महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होणार आहे. चंद्रावर लँड होणाऱ्या लँडर साठी शेवटची 15 मिनिटे खूप महत्त्वपूर्ण असतील. यावेळी लँडर चंद्राच्या सर्वात जवळ पोहोचेल. विक्रम लँडर स्वतःच लँडिंगची जागा शोधणार आहे.

इस्रोने ट्विट करून नुकतीच माहिती दिली आहे की संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी लँडिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. चांद्रयान 3 च्या लँडिंगच काऊंटडाउन सुरू झालं आहे. चांद्रयान वातावरणातील बाबी तपासून लँडिंग करणार आहे.. इस्रोचे शास्त्रज्ञ बंगळूर मधील कमांड सेंटर मध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंग नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. आज भारतात अनेक ठिकाणी चांद्रयान 3 चे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. संपूर्ण भारत आज चंद्रमय झालेला आहे.

Share This News
error: Content is protected !!