chandrayan 3

चांद्रयान-3 तयारी झाली ! काय आहेत वैशिष्ट्ये?

731 0

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो (ISRO) भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यान प्रक्षेपणाची अंतिम तारीख अद्याप ठरली नसली तरी, जुलैच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात इस्रो चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करू शकतो अशी माहिती इस्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

या चांद्रयान-3 ची काय आहेत वैशिष्ट्ये?
चांद्रयान-3 हा चांद्रयान-2 (Chandrayaan-2) मोहिमेचा पाठपुरावा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लॅण्डिंग आणि फिरण्यासाठी एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित करेल आणि लँडर रोव्हर जुळवणीचा यात समावेश आहे. चांद्रयान-3 चे प्राथमिक उद्दिष्ट हे लॅण्डिंग असणार आहे. त्यासाठी नवीन उपकरणं तयार करणं, चांगले अल्गोरिदम तयार करणं, अपयशी पद्धतींची काळजी घेणं, यासह बरेच काम केले जात आहे अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ (ISRO Chief S. Somnath) यांनी दिली आहे.

इस्रोने सीई-20 या क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती हॉट चाचणी पूर्ण केली आहे, जी चांद्रयान-3 साठी प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिकवरच्या टप्प्याला शक्ती देईल. चांद्रयान-3 जुलैमध्ये लॉन्च होणार तसेच, पहिलं सूर्यमिशनही लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!