कर्नाटकात भीषण अपघात ; 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

370 0

कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला.

पावागडामध्ये झालेल्या या अपघातात २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये ६० हून अधिक लोक प्रवास करत होते.

बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने हॉ़स्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!