‘बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना’; मुलीचा कुत्र्यांसमोर भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही शोले हा चित्रपट पाहिला असेलच या चित्रपटामधील ‘बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना’ हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. शोले चित्रपटातील या लोकप्रिय डायलॉगवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सोशल मीडियावर या डायलॉगवरून अनेक व्हिडिओ बनल्याचे तुम्ही पहिले असेल. सोशल मीडियावर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या डायलॉगला साजेसा असा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहून तुम्हीदेखील हसू आवरणार नाही.
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एक मुलगी कुत्र्यांच्या समोर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावर काही कुत्रे जमा झालेले दिसत आहे. या कुत्र्यांच्या घोळख्यात एक मुलगी मध्यभागी उभी राहिली आहे. एवढंच नाही तर ती डान्सही करताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर वेलकम या चित्रपटातील ‘ऊंचा लांबा कदम’च्या तालावर ही मुलगी नाचत आहे.
zore amol नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुलगी कुत्र्यांना अजिबात न घाबरता बेधडकपणे रस्त्यावर नाचत आहे. मुलीचा डान्स पाहून अनेकांना शोले मधील ‘बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना’ हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवला असेल.
