भावाशी झाले भांडण आणि बहिणीने चक्क मोबाईलच गिळला

637 0

भावा-बहिणीच्या भांडणात बहिणीने मोबाईल गिळल्याची घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडली आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून मुलीने गिळला मोबाइल बाहेर काढला.

भावा बहिणीचा वाद सुरू होताच बहीण संतापली आणि तिने फोन गिळला. मोबाईल गिळताच मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या. मुलीची अवस्था पाहून तिच्या कुटुंबीयांनी तातडीने ग्वाल्हेरच्या जयआरोग्य रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉ. प्रशांत श्रीवास्तव, डॉ. प्रशांत पिपरिया आणि डॉ. नवीन कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली कुशल डॉक्टरांनी वेळ न घालवता उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

मुलीचे अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि सीटी स्कॅनसह इतर तपासण्या सुरू करण्यात आल्या. एंडोस्कोपी किंवा लेप्रोस्कोपीद्वारे फोन काढता आला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या पोटातील फोन बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया पथकाने जवळपास दोन तास अथक परिश्रम केल्यानंतर मुलीच्या पोटातील मोबाइल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

ऑपरेशन दरम्यान मुलीला दहा टाके पडले. तिची प्रकृती स्थिर आहे. लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!