Gas Cylinder

Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त होणार ! मोदी सरकारचा मोठा निर्णय

798 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी निवडणूका लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळाने घरगुती गॅस सिलेंडर (Gas Cylinder) बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गॅस सिलेंडर आता 200 रुपयांनी स्वस्त होणार आहे. वाढत्या महागाईमध्ये नागरिकांसाठी ही एक दिलासाजनक बातमी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची (एलपीजी किंमत) 200 रुपयांनी कपात केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारने 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!