Indian Flag

Independence Day : स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत पहिल्यांदाच भारतातील ‘या’ 6 गावांमध्ये झालं झेंडावंदन! कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

998 0

आज देशभरामध्ये स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. मात्र छत्तीसगडमध्ये यंदाचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) अधिक खास असणार आहे. येथील नक्षलग्रस्त गावांमध्ये 77 वर्षांमध्ये पहिल्यांदाच तिरंगा फडकावला जाणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77 वर्षांनी पहिल्यांदाच या देशांमध्ये तिरंगा फडकला आहे. छत्तीसगडमधील पोलिसांकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.

या गावांमध्ये पहिल्यांदाच झेंडावंदन
बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला या अनोख्या झेंडावंदनासंदर्भात माहिती दिली. “मंगळवारी बीजापुर जिल्ह्यातील चिन्नागेलुर, तिमेनार, हिरोली तसेच सुकामा जिल्ह्यातील बेद्रे, दुब्बामरका आणि टोंडामरका गावांमध्ये तिरंगा फडकावला जाईल.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून या ठिकाणी कधीही तिरंगा फडकावला गेला नव्हता,” असं सुंदरराज यांनी सांगितलं. तसेच सुकमा येथील पिडमेल, डुब्बाकोंटा, सिलगेर आणि कुंडेड गावांमध्येही पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या गावांमध्ये याच वर्षी 26 जानेवारी रोजी पहिल्यांदा तिरंगा फटकावण्यात आला होता. या गावांमध्ये नक्षवाद्यांचा प्रभाव असल्याने यापूर्वी येथे कधीच झेंडावंदन झालेलं नव्हतं.

Share This News
error: Content is protected !!