एक देश एक निवडणूक (One Nation One Election) समितीची पहिली बैठक आज नवी दिल्लीत झाली. केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती 2 सप्टेंबर रोजी अधिसूचित केली होती. लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत चाचपणी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
देशाची राज्यघटना आणि इतर संवैधानिक तरतुदींच्या आधारावर ही समिती आपल्या शिफारसी सादर करेल. याबाबत राज्यघटनेत केलेल्या सुधारणांना राज्यांचीही मंजुरी आवश्यक आहे का याचा अभ्यास ही समिती करेल. या समितीमध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एन के सिंग, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे, संजय कोठारी यांचा समावेश आहे.