Election

Election : राजस्थानसह ‘या’ 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर

945 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election) आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर छत्तीसगडमधील निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार आहेत. सर्व राज्यांतील सरकारांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपणार आहे. कोणत्या राज्यात कधी पार पडणार मतदान जाणून घेऊया…

कोणत्या राज्यात मतदान कधी होणार?
मिझोराम – 7 नोव्हेंबर (एका टप्प्यात)
छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर (दोन टप्प्यात)
मध्य प्रदेश – 17 नोव्हेंबर (एका टप्प्यात)
राजस्थान- 23 नोव्हेंबर (एका टप्प्यात)
तेलंगणा – 30 नोव्हेंबर (एका टप्प्यात)

कोणत्या राज्यात किती जागा?
तेलंगणा – 119 जागा
राजस्थान – 200 जागा
मध्य प्रदेश – 230 जागा
मिझोराम – 40 जागा
छत्तीसगड – 90 जागा

Share This News
error: Content is protected !!